From the Soil to the Boardroom
I did not inherit a business. I inherited a work ethic, from a farming family that taught me patience, seasons, and the value of every single rupee. Everything since then has been built brick by brick.
A Farmer's Son
Born into a farmer Warkari family in Kanhe village, Maval taluka, the birthplace of Bhakti Shakti. Sitting at my father's paan stall from 5th to 12th standard, I learned people and their worlds. Our parents pushed us siblings toward higher education and something bigger.
Chief Minister Rural Development Fellow
Selected in 2017 for the Government of Maharashtra's Chief Minister Rural Development Fellowship. For three years I lived full time in seven villages across Junnar and Velhe talukas, working day and night on ground level transformation.
District Youth Awardee
Recognized for contribution to youth and community development, a milestone that pushed me to think bigger about what one determined person can build.
Founder and Builder
Leading Prolifique Media, growing Earthism Federation, and developing real estate projects, while mentoring young people who want to enter business, just like I once did.
🖋️ नांगरू स्वप्ने उद्याची...Read my full story, in my own words (Marathi) ▼
'भक्ती शक्ती' ची उगमभूमी असणाऱ्या मावळ तालुक्यातील कान्हे गावच्या एका शेतकरी वारकरी कुटुंबात माझा जन्म झाला. गावगाड्यातील सामाजिक भान असणाऱ्या एका जबाबदार कुटुंबात मला जन्म घेता आला. आई वडील यांच्यामुळे सभोवतालची माणसं महत्त्वाची वाटू लागली. कोणताही हेतू न ठेवता, एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होणारी, प्रेम करणारी ही सारी 'साधी माणसं' माझी प्रेरणा आहेत.
गावातील गणपती उत्सवापासून ते शिवजयंती पर्यंत विविध उपक्रमात सहभागी होत होतो. ५ ते १२ वी या काळात वडिलांच्या पानटपरीवर बसलो तिथं समाजातील लोक कळले, त्यांचे भावविश्व कळले. शेती व पानटपरीच्या व्यवसायाशिवाय मुलांनी अधिक वेगळे काहीतरी करावे, या तळमळीतून वडिलांनी आम्हा भावंडांना उच्च शिक्षणाची प्रेरणा दिली.
२०१७ साली महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री ग्रामविकास फेलो म्हणून निवड झाल्यावर, आयुष्याला वेगळी दिशा मिळाली. जुन्नर व वेल्हे या पुण्यातील दोन तालुक्यातील सात गावात दिवसरात्र तीन वर्षे काम केले. गावात पूर्णवेळ मुक्कामी राहून, गावाचा सर्व स्तरावर गुणात्मक विकास व्हावा, यासाठी प्रयत्न करता आले. गट शेतीच्या माध्यमातून शेतकरी कंपनी उभी रहाणे, जलयुक्त शिवार, महिला बचत गटाचे पुनर्जीवन, १००% घरांना गॅस व वीज जोडणी, जिल्हा परिषद शाळा संपूर्ण डिजिटल झाली. अस्मिता योजनेची अंमलबजावणी या सर्व गोष्टी या काळात घडवून आणता आल्या. शेतकऱ्यांच्या एका कंपनीस शासनाने एक कोटी रुपयांची अनुदान दिले, हा माझ्यासाठी आनंदाचा दिवस होता. आपण करत असलेल्या प्रयत्नांचे फळ पाहून अधिक जोमाने कामाला लागलो. शेत जमिनीच्या बांधाचा प्रश्न हा अत्यंत संवेदनशील प्रश्न आहे. या काळात पिढ्यानपिढ्या बांधा बांधावरील भाऊबंदकीचे वाद मिटवणारा संपूर्ण शासकीय मोजणीचा पहिला उपक्रम ९९ टक्के पूर्णत्वास आणता आला. ही गोष्ट समाधान देणारी आहे.
मावळ प्रबोधिनी (NGO) ते आजपर्यंत ज्या ज्या संस्था, व्यक्ती यांनी हे काम करण्याची संधी दिली, ज्यांच्यामुळे हे शक्य होऊ शकले, ज्यांच्यामुळे हे काम पुढे जाऊ शकले, त्यांचे आभार. नवा देश घडवताना 'तरूण' म्हणून जबाबदारी घेतली पाहिजे. 'नांगरू स्वप्ने उद्याची' हे बाबा आमटेंचे ध्येयवाक्य साध्य होण्यासाठी ज्ञान कमवता यावे, सेवा करता यावी, माणसे जोडली जावी आणि हे सारे पुन्हा समाजासाठी वापरले जावे असे वाटते.
आज त्याच मातीतल्या शिकवणीतून पुढचा प्रवास सुरू आहे. 'प्रोलिफिक मीडिया' च्या माध्यमातून महाराष्ट्रातील ब्रँड्स घडवण्याचे काम करतो आहे. सत्तरहून अधिक ब्रँड्स, महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे (DGIPR) पॅनल आणि सोळा जणांची तरुण टीम ही या प्रवासाची आजची ओळख. पर्यावरणासाठी 'अर्थिझम फेडरेशन' ही संस्था उभी करतो आहे, जिथे तरुणांच्या छोट्या छोट्या हरित कृतींमधून मोठा बदल घडावा हा प्रयत्न आहे. त्यासोबतच बांधकाम क्षेत्रात विश्वासावर आधारित प्रकल्प उभे राहत आहेत. गाव, माती आणि माणसं यांच्याशी असलेली नाळ तुटू न देता, व्यवसायातून समाज घडवण्याचा हा प्रयत्न असाच सुरू राहील.
Follow the Journey
Daily thoughts in Marathi for young entrepreneurs, behind the scenes of my ventures, and environment action on the ground.
Daily thoughts in Marathi for young entrepreneurs, ventures behind the scenes, and environment action on the ground.
Follow on Instagram